महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागात (Department of Land Records Maharashtra) सरळसेवा भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या भरतीअंतर्गत भूकरमापक (Land Surveyor) पदांसाठी एकूण ९०३ जागा भरण्यात येणार आहेत. ही भरती IBPS मार्फत घेण्यात येत असून, नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या लेखात आपण या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
भरतीसाठी उपलब्ध पदे आणि जागांचे वितरण
भूमी अभिलेख विभागात खालीलप्रमाणे पदे :
- भूकरमापक (Land Surveyor): एकूण ९०३ पदे.
 
विभागानुसार जागांचे वितरण खालीलप्रमाणे आहे:
- पुणे प्रदेश: ८३ जागा
 - कोकण प्रदेश, मुंबई: २५९ जागा
 - नाशिक प्रदेश: १२४ जागा
 - छ. संभाजीनगर प्रदेश: २१० जागा
 - अमरावती प्रदेश: ११७ जागा
 - नागपूर प्रदेश: ११० जागा
 
या पदांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रात असेल.
वेतनश्रेणी रु. १९,९०० ते रु. ६३,२०० पर्यंत आहे.
हे पण बघा: स्टाफ सिलेक्शन द्वारे 7,565 पदांची पोलीस भरती जाहीर
पात्रता निकष
उमेदवारांनी खालील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे:
- शैक्षणिक पात्रता: स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (Diploma in Civil Engineering) किंवा १०वी उत्तीर्ण + ITI (सर्वेक्षक अभ्यासक्रम).
 - टायपिंग कौशल्य: मराठी टंकलेखन ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन ४० शब्द प्रति मिनिट गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र.
 - वय मर्यादा: २४ ऑक्टोबर २०२५ रोजी १८ ते ३८ वर्षे. मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्षांची सूट मिळेल.
 
उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया आणि शुल्क : अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल. अर्ज IBPS च्या अधिकृत वेबसाइट https://ibpsreg.ibps.in/gomsep25/ वर उपलब्ध आहे.
- अर्ज शुल्क: अमागास (ओपन) प्रवर्गासाठी रु. १०००/- आणि मागासवर्गीयांसाठी रु. ९००/-.
 
अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे: वेबसाइटवर नोंदणी करा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि शुल्क भरून अर्ज सबमिट करा.
महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाईन अर्ज सुरू: १ ऑक्टोबर २०२५. ibpsreg.ibps.in
 - ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २४ ऑक्टोबर २०२५.
 - परीक्षा तारखा: —–
 
निवड प्रक्रिया : निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षेवर आधारित असेल. परीक्षा IBPS मार्फत घेण्यात येईल आणि यशस्वी उमेदवारांची निवड मेरिट लिस्ट नुसार होईल.